देशात कोरोना व्हायरस मुळे सध्या लॉकडाउन आहे. अशात दूरदर्शन डीडी नॅशनल चॅनलवर रामायण मालिका दाखवली जात आहे. टीव्ही क्षेत्रामध्ये इतिहास रचलेल्या या मालिकेचे पुनरागमन झाले आहे. लोक पुन्हा एकदा आवडीने ही मालिका पाहात आहेत. २५ जानेवारी १९८७ मध्ये रामानंद सागर यांची सिरीयल प्रसारित होताच गली बोळात कोणी ही दिसत नव्हते.

रेल्वे स्टेशन वर सुद्धा रामायण पाहिल्या शिवाय रेल्वे पुढे जात नव्हती. या सिरीयल मधल्या राम आणि सीताला लोक देव म्हणून पुजत होते. आज रामायण पुन्हा एकदा प्रसारित झाले आहे. त्यामुळे सध्या ही मालिका चर्चेचा विषय बनली आहे. रामायण मधल्या कलाकारांविषयी बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. आज आपण रामायण सिरीयल मध्ये माता सिताचा रोल करणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया हिला मालिकेत माता सिताचा रोल कसा मिळाला याबद्दल जाणून घेणार आहोत.

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर १९८० च्या दशकात सिनेमा व्यतिरिक्त लहान मुलांसाठी विक्रम-वेताळ नावाची मालिका बनवली होती. या मालिकेची शुटींग रामानंद सागर यांच्या बंगल्यात चालू होती. त्यावेळी दीपिका चिखलिया या मालिकेमध्ये राज कुमारीची भूमिका करत होती.

एके दिवशी दीपिकाने तिथे काहीं मुलांची गर्दी पाहून एकाला विचारना केली की इथे काय चालू आहे. तेव्हा तिला कळाले की रामानंद सागर एक नविन मालिका रामायण मधील लव-कुश या भूमिकेसाठी ऑडिशन  घेत आहेत. तेव्हा दीपिकाने विचारले की सीता या भुमिकेसाठी कोणाची निवड झाली आहे का? तेव्हा तिला कळले की सीता या भूमिकेसाठी कोणाचीही निवड झालेली नाही.

या गोष्टीची माहिती मिळताच दीपिकाने रामानंद सागरला सीताच्या भूमिकेसाठी फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामानंदजी ने सागितले की सीताच्या भूमिकेसाठी अशी कलाकार पाहिजे की ती शुटींगदरम्यान व गर्दीत चालताना सीता म्हणून ओळखू आली पाहिजे. तेव्हा दीपिका हसत म्हणाली की इतके दिवस मी आपल्या स्टेजवर राज कुमारी म्हणून मुकुट घालून वावरत आहे त्यावेळी तुम्हाला एकदा ही सीता सारखी दिसली नाही का?

तेव्हा रामानंदने दीपिकाला सीताच्या भुमिकेसाठी दीपिकाला ऑडिशन ला बोलावून घेतले. दीपिकाने रामानंदजीच्या स्टुडियोमध्ये सीताच्या भुमिकेसाठी कमीत कमी चार वेळा स्क्रीन टेस्ट दिली. शेवटी दीपिका चिडून म्हणाली की घ्यायचे असेल तर घ्या किंवा नका घेवू... तेव्हा रामानंद सागरला दीपिकाची स्क्रीन टेस्ट पसंत आली आणि दीपिकाला अखेर सिताची भूमिका मिळाला.

Post a Comment

Previous Post Next Post