कलर्स चॅनल वरील सुपरहिट मालिका ‘बालिका वधू’ पुन्हा एकदा टीव्ही प्रसारित करण्यात येत आहे. याचबरोबर मालिकेसंबंधित जुन्या आठवणीसुद्धा ताज्या झाल्या आहेत. बालिका वधू मधील जग्या आणि आनंदीला दर्शकांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि आजसुद्धा लोक त्यांची आठवण काढतात. नुकतेच आम्ही तुम्हाला जग्या म्हणजेच अविनाश मुखर्जीबद्दल सांगितले होते आणि आज आम्ही तुम्हाला आनंदी म्हणजेच अविका गौरबद्दल सांगणार आहोत.

अविका गौरने वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी आनंदी बनून लोकांच्या मनात आपली एक खास जागा निर्माण केली होती. २००८ मध्ये बालिका वधू या मालिकेचे प्रसारण सुरु झाले होते. कलर्स टीव्ही वर या मालिकेचे प्रसारण ८ वर्षे करण्यात आले.
तसे तर बालिका वधू मालिकेमधील सर्व भूमिका लोकप्रिय झाल्या होत्या. परंतु जेवढे प्रेम जग्या आणि आनंदी या दोन भूमिकांना मिळाले, क्वचितच इतके प्रेम इतर भूमिकांना मिळाले असेल. हेच कारण आहे की अविकाने अनेक चित्रपटांमध्ये आणि इतर टीव्ही शो मध्ये काम केले, पण आजसुद्धा लोक तिला छोटी आनंदी या भुमिकेमुळेच ओळखतात.

वयाच्या ११ वर्षी लहान वया मध्ये अविका गौरचे लाखो चाहते बनले होते. बालिका वधू मध्ये अविका गौर राजस्थानी बींदणी (बहू) बनली होती. ही मालिका बाल विवाह प्रथेवर आधारित होती. ज्या वयात अविकाला हे सुद्धा माहित नव्हते की बाल विवाह काय असतो. ही प्रथा अजूनही कायम आहे का? त्या वयामध्ये अशी दमदार भूमिका करणे कौतुकास्पद आहे.

एका मुलाखतीमध्ये अविका गौरने सांगितले होते की, तिला त्यावेळी ना ही टीआरपीची समज होती ना ही बाल विवाह सारख्या टॉपिकची. ती दररोज शाळेनंतर शुटींगला जात होती आणि नंतर मेकअप दादाकडून गणिताचे धडे घेत होती.

अविका गौर गुजराती कुटुंबातील आहे. लहानपणापासूनच तिला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. तिने वयाच्या १० वर्षीच फॅशन वीकमध्ये भाग घेतला होता, ज्यामध्ये तिला बेस्ट मॉडेलचा किताब मिळाला होता.

बालिका वधूनंतर अविका गौरने ससुराल सिमर का, बेइंतहा, राजकुमार आर्यन आणि लाडो: वीरपुर की मर्दानी सारख्या मालिकांशिवाय अनेक रियालिटी शोमध्ये देखील भाग घेतला होता. आता तर अविका गौरचा अंदाज पूर्णपणे बदलला आहे. ती आणखीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसू लागली आहे.

टीव्हीशिवाय अविका गौरने हिंदी, तमिळ आणि तेलगु भाषांच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील तिने अनेक टॉपच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. हिंदीमध्ये अविका गौरने ए मॉर्निंग वॉक,‘पाठशाला आणि तेज सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सध्या अविका गौर हैदराबाद मध्ये स्थायिक आहे आणि बालिका वधू पुन्हा प्रसारित होत आहे म्हणून खूपच खुश आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत लाईव चॅट देखील केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post