बॉलीवूड मध्ये यश मिळवणे एवढे सोपे नाही, बरेच लोक इथे एक चान्स मिळवण्यासाठी संपूर्ण जीवन घालवतात. बऱ्याच जनाला यश मिळत परंतु ते सांभाळू शकत नाहीतर असे ही म्हटले जाते की स्टार होण सरळ आहे पण स्टारडम कायम ठेवण सोपे नाही. बॉलीवूड मध्ये अनेक असे कलाकार आहेत. की त्यांनी उंच शिखर गाठले पण तिथे पोहचून ते स्वताला  सांभाळू शकले नाहीत. ते  तोडघशी असे पडले की त्यांना कोणी उठऊ शकत नाही. असेच एक नाव आहे ममता कुलकर्णी.

९० च्या दशकातील बॉलीवूड एक्ट्रेस ममता कुलकर्णी आपल्या बोल्ड अदाकारीने लोकांच्या मनात एक वेगळी छाप पाडली. तिचा जन्म २० एप्रिल १९७२ रोजी मुंबई येथे झाला. तिच्या करियरची सुरवात १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिरंगा या चित्रपटामधून झाली. यात तिचा छोटासा रोल होता. १९९३ मध्ये तिचा आशिक आवारा हा चित्रपट हिट झाला होता. याच वर्षी ममताने टॉपलेस फोटोशूट करून खळबळ माजवली होती.

ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा ती फिल्म इंडस्ट्री मध्ये नवीन होती. तिला कोणी ओळखत नव्हते त्या वेळेस स्टारडस्ट मॅगजीनच्या कव्हर शूटसाठी नविन चेहऱ्याचा शोध सुरु होता. मोठ मोठ्या हिरोईनने फोटोशूट करण्यास नकार दिला होता. त्या वेळेस कोणी तरी ममता कुलकर्णीच्या नावाची शिफारस केली होती. ममता यासाठी लगेच तयार झाली. पण तिला जेव्हा सांगण्यात आले की फोटोशूटसाठी टॉपलेस व्हावे लागेल हे एकून तिच्या पाया खाली जमिनच सरकली.

काहीं वेळाने विचार करून ममताने होकार दिला पण तिने एक अट ठेवली. तिला तो फोटोशूट पसंत आला तरच ते छापले जावे, नाही तर नाही. मेकर्सने ममताची ही गोष्ट मान्य केली ममताने कीटकीट न करता टॉपलेस पोज दिली. ममताला फोटोशूट आवडला आणि लवकरच मार्केट मध्ये तो आला या फोटोशूटने ममता कुलकर्णी खूपच प्रसिद्ध झाली होती. परंतु काही लोकांना ममताचा हा टॉपलेस फोटो आवडला नाही.

नामवंत प्रोड्यूसर्स आणि दिग्दर्शकने ममता कुलकर्णीला चित्रपटामध्ये घेण्याची इच्छा व्यक्त केली. इथूनच ममता कुलकर्णीचे स्टारडम म्हणून अनेक नवे मार्ग खुले झाले. परंतु कोणालाच माहित नव्हते की काहीं वर्षाने कीर्ति आणि स्टारडम असे रूप घेईल की ममता कुलकर्णी जमिनीवर येईल.

सुरवातीला ममताचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सोबत संबध होते. अशा बातम्या येत होत्या, पुन्हा काहीं दिवसाने तिचे नाव ड्रग तस्कर विक्की गोस्वामी सोबत जोडले गेले. असे ही कळले की दोघांनी लग्न केले आहे. तस्करी करत असताना विक्की जेल मध्ये गेला. या नंतर ममता कुलकर्णी देव भक्तीत रमून गेली आणि तिने ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिन नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यांत तिने असे म्हटले आहे की तुपाचे पुन्हा दुध बनवणे शक्य आहे का.

Post a Comment

Previous Post Next Post