बॉलीवूडची जबरदस्त सुंदर अ‍ॅक्ट्रेस दिव्या भारतीच्या मृत्यूचा उलगडा अजून झालेला नाही. १९ वर्षाची दिव्या भारती या दुनियेतून निघून गेली. तिने वयाच्या १६ वर्षी अभिनय करण्यास सुरुवात केली होती. १९ व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीज मध्ये सर्वात महागडी अभिनेत्री होती. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप ही उलगडलेले नाही. दिव्या ने अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते. बॉलीवूड मध्ये तिने टॉप ची जागा घेतली होती.
परंतु ती ५ एप्रिल १९९३ रोजी संध्या काळी तिच्या घराच्या पाचव्या मजल्या वरून खाली पडली आणि तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू एक अपघात होता की अत्महत्या हे रहस्य आणखीनही कळू शकले नाही. बॉलीवूड चा प्रसिद्ध दिग्दर्शक प्रोड्यूसर साजिद नाडियाडवाला याच्याशी तिने लग्न केले होते. दिव्या आज ही नाडियाडवाला फॅमिलीची ओळख आहे. असे साजिद नाडियाडवालाची दुसरी पत्नी वर्धा नाडियाडवाला म्हणते.

तसेच वर्धा नाडियाडवाला ने बॉलीवूड हंगामा एक्सक्लूसिवला ही गोष्ट सांगितली दिव्या जरी आज या दुनियेत नसली तरी ती आज ही आमच्या फॅमिलीची ओळख आहे. वर्धा म्हणते आजही लोक आम्हाला या गोष्टी बदल विचारपूस करतात. अशा लोकांना मी सांगू इच्छीते की दिव्या आमच्या फॅमिलीची ओळख आहे.

दिव्या च्या फॅमिलीतील वडील, भाऊ कुणाल, सगळेच आमचे फॅमिली आहेत. आम्ही सर्वजन सेलिब्रेशन मध्ये सोबत असतो. जेव्हा पण लोक दिव्या भारती वरून मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याचे मला दुख होते. दिव्या ची पुण्यतिथी, जन्मदिवस रोजी आम्ही एकमेकांची विचारपूस करत असतो. जेव्हा कधी माझे मुल दिव्याचे चित्रपट पाहतात तेव्हा बडी ममिकी फिल्म असे म्हणतात. अजूनही दिव्या आमच्या जीवनातील एक भाग आहे.

वर्धा असेही म्हणाली की साजिदचे व दिव्याच्या वडिलांचे आणि भावाचे चांगले सबंध आहे. साजिद दिव्याच्या फॅमिली च्या सोबत आहे. दिव्याच्या आईचा मृत्यू झाल्या नंतर साजिद आणि तिचे वडील पिता पुत्रा सारखे सबंध ठेऊन होते. तुम्ही विचारही करू शकत नसाल की डॅड आणि साजिद किती जवळ आहेत. तसेच कुणाल आणि साजिद दोघेही भावा प्रमाणे गोष्टी करतात.

मी कधिही दिव्याची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी माझी स्वताची ओळख निर्माण केली आहे. आठवणी सदैव स्मरनार्थ राहतात. यामुळे मला ट्रोल करण बंद करा. लोक असे म्हणतात की दिव्या बहुत अच्छी थी होय बेशक दिव्या चांगली होती. आम्ही आजही तिला आठवण करतो. ती आमच्या आयुष्याचा भाग आहे.

Post a Comment

Previous Post Next Post