सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. पण अजून देखील लोकांच्या मनामधून त्याच्या जाण्याचे दु:ख गेलेले नाही. राज बब्बरची मुलगी जुही बब्बर द्वारे शेयर केलेल्या सुशांतच्या पहिल्या प्लेचा फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर जुहीने एक फोटो शेयर करून सांगितले होते कि बालाजीने त्याला कसे शोधले होते.

जुहीने हा फोटो शेयर करून थियेटरप्रती सुशांतचे प्रेम आणि त्याच्यासोबतच्या आपल्या नात्याचा उल्लेख केला आहे. तिने लिहिले आहे कि, मी सुशांतला २ प्लेमध्ये ठेवले होते. २००७ मध्ये त्याने आपला पहिला प्ले पुकार आणि दुसरा कॉमेडी प्ले दौड़ा दौड़ा भागा भागा सा मध्ये काम केले होते. एका प्ले दरम्यान बॉक्स ऑफिस काउंटरमध्ये तिकीट सांभाळताना बालाजीच्या कास्टिंेग पर्सनने त्याला शोधले होत. सुशांत टीव्ही आणि चित्रपट स्टार बनल्यानंतर देखील आपल्या थियेटरच्या दिवसांतील मित्रांशी संपर्कात राहिला.

आणि माझ्या तर एका कॉलवर नेहमी व्यस्त असून देखील एक दूजे थियेटर ग्रुपच्या शोज आणि इवेंट्समध्ये तो नक्की यायचा. मला तो दीदी म्हणत होता आणि नेहमी खूप प्रेमाने म्हणायचा, दीदी तुम्ही माझ्या पहिल्या डायरेक्टर होता. सुशांत तुला पाहून नेहमी किती आनंद वाटायचा, हे काय केलेस माझ्या भावा? आणि का केलेस? आम्ही तुला मिस करू.

या शोमधून मिळाला होता सुशांतला पहिला ब्रेक

सुशांत सिंह राजपूतने २००८ मध्ये आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली होती. किस देश में है मेरा दिल हा त्याचा पहिला शो होता. यानंतर त्याने २००९ मध्ये पवित्र रिश्ता सिरीयलमध्ये मुख्य भूमिका साकारली होती, ज्यानंतर त्याला घराघरामध्ये ओळखले जाऊ लागले होते. सुशांतने २०१३ मध्ये काई पो छे चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्याचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा आहे जो २४ जुलै रोजी डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post