लग्नाबद्दल प्रत्येक मुलीचे अनेक स्वप्ने असतात, प्रत्येक मुलगी त्या स्वप्नांसोबत आपल्या आयुष्याचे २०-२५ वर्षे घालवते तेव्हा कुठे हा दिवस येतो. मुलीला लग्नानंतर आपले स्वतःचे घर सोडून दुसऱ्याच्या घरी जावे लागते. तिच्या मनामध्ये प्रश्न असतात कि आपले घर कसे असेल, नवीन कुटुंब, तिचा पती. तिच्या मनामध्ये संभ्रम तर असतो पण त्याचबरोबर एक आनंद देखील असतो. लग्नाच्या अगोदर अनेक विधी पूर्ण केल्या जातात, जसे हळद, टीका लावणे ई. पण इथे एका लग्नामध्ये काही असे झाले जे ऐकून प्रत्येकाची मान शरमेने खाली जाईल.

खरे तर उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये लग्नाच्या ठीक अगोदर वधूसोबत अशी काही घटना घडली ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. लग्नाच्या अगोदर वरच्या पक्षाने एका अफवेमुळे वधूचे कपडे काढायला भाग पाडले, ते देखील कुटुंबाच्या समोर. हे सर्व फक्त याची पुष्टी करण्यासाठी केले गेले कि मुलीला त्वचेचा रोग आहे ज्याला पांढरे डाग देखील म्हणतात. कोणीतरी अशी अफवा उठवली होती ज्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीचे कपडे काढायला भाग पाडले.

कानपूर येथील राहणारा एक मुलगा जय हिंद आणि उत्तर प्रदेशच्याच महोबा जिल्ह्यामध्ये राहणारी मुलगी तिजा यांचे लग्न होणार होते, सर्व काही व्यवस्थित सुरु होते पण अचानक जेव्हा नातेवाईकांनी सांगितले कि तिजाच्या शरीरावर पांढरे डाग आहेत तेव्हा मुलगा लग्न करण्यास माघार घेऊ लागल. हि गोष्ट मुलाच्या कुटुंबियांना समजल्यावर त्यांनी देखील या लग्नाला नकार दिला. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच वाद झाला आणि प्रकरण लग्नाच्या मंडपामधून पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी पंचायत बोलावून दोन्ही पक्षांच्या वडिलधाऱ्या व्यक्तींना समोर घेऊन प्रकरण सोडवले.

दोन्ही पक्षांच्या वडिलधाऱ्या व्यक्तींचे म्हणणे ऐकल्यानंतर पंचायतने विचार करून निर्णय घेतला कि लग्न तेव्हा होईल जेव्हा याची पुष्टी होईल कि मुलीच्या शरीरावर डाग नाहीत. ज्यानंतर पोलीस ठाण्यातील एका खोलीमध्ये मुलीला मुलाच्या महिला नातेवाईकांसमोर कपडे उतरवावे लागले. ज्यानंतर याची पुष्टी झाली कि मुलीच्या शरीरावर कोणतेही डाग नाही. तेव्हा कुठे प्रकरण शांत झाले आणि नंतर मुलाच्या वडिलांनी माफी मागितली आणि नंतर लग्न संपन्न झाले.

Post a Comment

Previous Post Next Post