बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या सु सा ई ड प्रकरणामध्ये सतत नवीन खुलासे समोर येत आहेत. अभिनेत्याच्या निधनाच्या जवळ जवळ दीड महिन्यानंतर त्याच्या कुटुंबाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध एफआईआर दाखल केली होती ज्यानंतर या प्रकरणाला सतत नवीन वळण येत आहे. तिच्या कुटुंबाने अभिनेत्रीवर फसवणूक आणि त्याला सु सा ई डसाठी प्रवृत्त करण्यासाठी दबाव टाकणे असे गंभीर आरोप लावले आहेत.

आता सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास कुमार यांनी दावा केला आहे कि दिवंगत अभिनेता आणि रियाची भेट १४ एप्रिल २०१९ रोजी एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीमध्ये झाली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी रिया जेव्हा सुशांतच्या घरी गेली तेव्हा त्याची बहिण प्रियांका आणि तिची भेट झाली. सुरुवातीला तर रिया आणि सुशांतच्या फॅमिली दरम्यान सर्वकाही ठीक होते पण भेटीच्या एक आठवड्यानंतर २१ एप्रिलला सर्व गोष्टी बिघडू लागल्या. सुशांत रियासोबत अभद्र व्यवहार करण्यावरून आपली बहिण प्रियांकावर नाराज झाला.

सुशांतच्या बहिणीसोबत रियाने केली होती पार्टी

सुशांतच्या कुटुंबाच्या वकिलांनी एका न्यूज वेबसाईटशी बोलताना सांगितले कि १९ एप्रिलला प्रियांका आणि तिचा पती यांना दिल्लीसाठी रवाना व्हायचे होते पण सुशांतने आपल्या बहिणीला काही दिवस थांबण्यासाठी सांगितले, ज्यामुळे प्रियांकाचे तिकीट कँसल केले गेले. १९ च्या संध्याकाळी सुशांतने रियाच्या उपस्थितीत प्रियांकाला एक इमोशनल लेटर लिहिले. दुसऱ्या दिवशी (२० एप्रिल) रोजी रियाने सुशांत आणि प्रियांकाला आपला भाऊ शौविक चक्रवर्तीच्या बर्थडे पार्टीमध्ये बोलावले.

प्रियांका आणि सुशांत थकले होते आणि त्यांनी पार्टीमध्ये जाण्यास नकार दिला. सुशांत झोपण्यासाठी गेला पण रियाने जबरदस्ती करून प्रियांकाला तयार करून पार्टीमध्ये घेऊन गेली. जेव्हा प्रियांका इथे पोहोचली तेव्हा रियाच्या भावाने सांगितले कि त्यादिवशी त्याचा बर्थडे नव्हता पण तो आजच सेलिब्रेट करणार आहे. प्रियांकाला नंतर समजले कि रियाने पार्टीचे बिल देण्यासाठी सुशांतच्या क्रेडीट कार्डचा वापर केला. पार्टीनंतर रिया देखील सुशांतच्या घरी आली, ज्यानंतर प्रियांका तर झोपण्यासाठी गेली पण सुशांत आणि रिया बातचीत करत राहिले.

रियाने प्रियांकावर लावले होते आरोप

दुसऱ्या दिवशी सकाळी २१ एप्रिलला जेव्हा प्रियांका झोपून उठली तेव्हा रिया तिथे नव्हती आणि सुशांत खूपच रागामध्ये होता. रियाने सुशांतला म्हंटले होते कि बर्थडे पार्टीनंतर प्रियांकाने रियाचा फायदा घेतला आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि १८-१९ एप्रिल दरम्यानच्या रात्री तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. सुशांतने रियाच्या गोष्टीवर विश्वास ठेऊन प्रियांकासोबत भांडण केले. प्रियांकाला शांती हवी होती आणि तिला तेथून जायचे होते.

प्रियांकाने एयरपोर्टवर पोहोचल्यानंतर हि गोष्ट आपल्या पतीला सांगितली आणि म्हंटले कि तिच्यावर लावलेले आरोप खोटे आहेत कारण १८-१९ च्या रात्री ते (प्रियांकाचे पती) देखील तिथे होते. प्रियांकाच्या पतीने व्हॉट्सअप मॅसेज द्वारे सुशांतसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

Post a Comment

Previous Post Next Post