या जगामध्ये जो जन्म घेतो त्याचा एक ना एक दिवस मृत्यू अटळ आहे. तसे तर जगामध्ये अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक धर्माचा वेगवेगळा रितीरिवाज आहे. धर्मामध्ये मनुष्याच्या अंतिम संस्काराची वेगवेगळी प्रथा आहे. काही शरीराचे दफन करतात तर काही शरीराचे दहन करतात. पण आम्ही अशा एका प्रथेबद्दल सांगणार आहोत जी खूपच विचित्र आहे. यामधील काही पूर्वी देखील होत होती तर काही आतादेखील होते.

कधीच पाहू नये किन्नरांचे अंतिम संस्कार

आज आम्ही किन्नरांच्या अंतिम संस्कारा संबंधी एक अशा परंपरेबद्दल सांगणार आहोत कि सामान्य परंपरेपेक्षा खूपच विचित्र आहे. किन्नरांचा अंतिम संस्कार सामान्य माणसाप्रमाणे होत नाही तो खूपच वेगळ्या पद्धतीने केला जातो. सामान्य बाब आहे सामान्य व्यक्तीचा अंतिम संस्कार दिवसा केला जातो तर किन्नरांचा अंतिम संस्कार रात्रीच्या अंधारामध्ये केला जातो. यामुळे सामान्य लोकांनी किन्नरांचा अंतिम संस्कार कधीच पाहू नये. याबद्दल असे सांगितले जाते कि जर एखाद्या व्यक्तीने किन्नरांचा अंतिम संस्कार पाहिला तर तो किन्नर पुन्हा किन्नराच्याच जन्माला येतो.

आधी करतात हे काम

किन्नरांच्या अंतिम संस्कारा अगोदर तिथे उपस्थित असलेले सर्व किन्नर मृत किन्नरच्या बॉडीला चपलांनी मारतात. किन्नर असे यामुळे करतात कारण त्याने आपल्या जन्मामध्ये केलेल्या सर्व पापांचे प्रायश्चित्त होऊ शकेल आणि तो व्यक्ती पुन्हा किन्नराच्या रुपामध्ये जन्म घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post